संपादकीय
टेलिव्हिजनच्या वृत्तवाहिन्या भारतीयांच्या रोजमर्रा वापरातल्या शब्द- भांडाराला सूज आणत आहेत. अनेक नव्या संकल्पना आणि त्यांच्यासाठी वापरले जाणारे नवे शब्दप्रयोग यांच्यातून हा ‘फुगारा’ आणला जातो आहे. तसे हे नेहमीच घडत असते, पण निवडणुकींच्या काळात याला ऊत येतो. मे 2004 च्या निवडणूक काळातही हा सुजवटा-फुगवटा प्रकार भरपूर प्रमाणात दिसला. काही उदाहरणे तपासण्याजोगी आहेत. जसे, कोणतेही सरकार नव्याने …